क्राईम
ताज्या बातम्या
राष्ट्रीय
राज्य
राजकीय
शैक्षणिक
ताज्या बातम्या
Satish Mane
December 8, 2025
0
वडगाव शेरी -चंदननगर मधील वाढत्या गुन्हेगारीवर प्रतिबंध उपाय योजना करण्याची मागणी
Satish Mane
November 21, 2025
0
सिंहगड परिसरातील वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी
Satish Mane
November 21, 2025
0
आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्यासाठी सामंजस्य करार
Satish Mane
November 21, 2025
0
रविवारी १ हजार ४०० परीक्षा केंद्रावर होणार टीईटीची परीक्षा
पुणे,दि. १९: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या रविवार २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी १ हजार ४२३ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेमार्फत उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती परिषदेच्या अध्यक्षांनी कळविली आहे.
परीक्षेच्या पेपर १ साठी २ लाख ३ हजार ३३४ तर पेपर २ साठी २ लाख ७२ हजार ३३५ असे एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षार्थींना ओळख पटवूनच प्रवेश देण्यात येईल. परीक्षा दालनामध्ये मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाता येणार नाही.
सर्व परीक्षा दालनामध्ये, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर व केंद्र संचालकांच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. परीक्षेसंदर्भात समाजमाध्यम व प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या, अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व http://mahatet.in या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे, असेही कळविण्यात आले आहे.
Satish Mane
November 21, 2025
0
महापालिका प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध
Satish Mane
November 18, 2025
0
वाघोली पॅटर्न उमेदवारांना तारणार का…
वाघोली-विमान नगर- लोहगाव- खराडी मध्ये मतदारांना आकर्षण करण्यासाठी सहलीचे अमिष
देव दर्शन नको, प्रभागामध्ये विकास कामे करा
Satish Mane
November 18, 2025
0
वाघोली पॅटर्न उमेदवारांना तारणार का…
वाघोली-विमान नगर- लोहगाव- खराडी मध्ये मतदारांना आकर्षण करण्यासाठी सहलीचे अमिष
देव दर्शन नको, प्रभागामध्ये विकास कामे करा
पुणेः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीमध्ये वाघोली- हवेली विधानसभेचे आमदार माऊली कटेक यांनी उज्जेन यात्रा काढल्या होत्या. या निवडणूकी मध्ये कटके भरघोस मतांनी निवडणूक आले. तोच पॅर्टन आता पालिका निवडणूकीसाठी प्रभाग तीन विमाननगर-लोहगाव-वाघोली आणि प्रभाग चार वाघोली- खराडी मध्ये इच्छुकांनी सुरू केला आहे. या प्रभागांमधील मतदारांना उज्जैन, काशी, अक्कलकोट, दिक्षा भुमी, अजमेर असा ठिकाणी पर्यटन सहली काढल्या जात आहे. मात्र, प्रभागातील विकासकामाची दुरावस्था पाहता. मतदार देव दर्शन नको, विकास कामे करा असे म्हणत आहे.
पालिकेत समाविष्ट झालेल्या वाघोली- लोहगाव या गावामध्ये अनेक विकास कामे रखडली आहेत. या गावातील नागरिकांनी विकासकामासाठी अनेकांनी अर्ज केले. नागरिकांनी आंदोलन केले. तरी, गावाच्या विकास कामासाठी निधी मिळाला नाही. या गावामध्ये रस्ता, पाणी, ड्रनेज, कचरा अशा मुलभूत समस्याच्या खुप बिकट परिस्थिती आहे. मात्र, तरी पालिका निवडणूकीसाठी इच्छुक असणारे समस्या बाबत सोयीस्कर पणे दुर्लक्ष करत आहेत. इच्छुकांनी समस्या वर बोलण्या ऐवजी देवदर्शन यात्रा काढत आहे. चौका-चौकामध्ये निवडणूकीत मी पंधरा- दहा कोटी खर्च करणार असे जाहिर सांगत आहे. मंडळ, सोसायटी ना पन्नास हजार ते लाख रुपयांपर्यत देणग्या देत आहे. बचत गटांना पैसे दिले जात आहे. पेड कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. याबाबत एका इच्छुकांनी सांगितले की, विमाननगर भागातील मतदारांच्या पर्यंत पोहण्यासाठी आम्ही देवदर्शन योजना सह अनेक उपक्रम राबवित आहे. आमच्या प्रत्येकाचे बजेट पंधरा कोटी पर्यंत आहे. या बजेटच्या आधारे आम्ही नक्कीच निवडणूक येणार आहे.
लोहगाव मध्ये पिण्याच्या पाणी, कचरा, पुर परिस्थिती, ड्रनेज लाईन अशा विविध समस्या आहेत. सर्व इच्छुकांनी पाच पाच कोटीची विकास कामे केली. तरी, गावातील समस्या सुटतील. पण, इच्छुक विकास कामे करण्या ऐवजी देव दर्शनामध्ये व्यस्त आहे. मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार करत आहे. मतदार या आमिषाला भुलणार नाहीत. वाघोली पॅटर्न इथे चालणार नसल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे.
Satish Mane
August 5, 2025
0
दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात येतील- हिंगणे
Satish Mane
August 5, 2025
0
महसूल सप्ताह 2025 अंतर्गत सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 7 चंदननगर येथे कार्यक्रमाचे आयोजन..
Satish Mane
June 9, 2025
0
शिवकालीन युध्दकला शिबीरामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला- माजी आमदार जगदिश मुळीक
वडगाव शेरी-
सध्याच्या काळात स्वंरक्षणासाठी शिवकालीन युध्दकला शिकणे खुप महत्वाचे आहे. या युध्दकला मुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. शिवरायांची प्रेरणा घेऊन भविष्यातील ध्येय साधले केले पाहिजे. या शिवकालीन युध्दकला मुळे मुलांमध्ये स्वयंशिस्त येते. याचा उपयोग त्यांना ध्येय साधण्यात होणार असल्याचे मत वडगाव शेरी चे माजी आमदार जगदिश मुळीक यांनी व्यक्त केले.
वडगाव शेरी मध्ये नगरसेविका श्वेता गलांडे फाउंडेशन आणि फिरंगोजी शिंदे बहुद्देशीय सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने वडगाव शेरी मध्ये शिवकालीन युध्द कला प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी मुळीक बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेविका श्वेता गलांडे, महेश गलांडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, अनिल नवले, दत्तात्रय सोंडेकर, सुधीर गलांडे, चंद्रकांत सातव, लक्ष्मण गलांडे, आशा जगताप, गणपत डांगे, शाहीर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेविका श्वेता गलांडे म्हणाल्या की, आपण तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी यांसारख्या पारंपरिक शस्त्रकलेचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. ही कला केवळ शारीरिक ताकदीची नाही, तर ती शिस्त, संयम आणि आत्मविश्वासाची शिकवण देते. हीच ती कला आहे, जिच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक महान स्वराज्य उभं केलं. आजच्या काळात महिलांनी फक्त शिक्षण, व्यवसाय, प्रशासन या क्षेत्रात नव्हे, तर स्वसंरक्षण व राष्ट्र रक्षणाच्या दृष्टीने सज्ज राहणं गरजेचं आहे. या दहा दिवसांच्या प्रशिक्षणातून आपल्यामध्ये जी शारीरिक व मानसिक ताकद निर्माण झाली आहे. ती कधीही उपयोगी पडू शकते. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी, किंवा अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी.
Next page