शिवकालीन युध्दकला शिबीरामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला- माजी आमदार जगदिश मुळीक
वडगाव शेरी-
सध्याच्या काळात स्वंरक्षणासाठी शिवकालीन युध्दकला शिकणे खुप महत्वाचे आहे. या युध्दकला मुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. शिवरायांची प्रेरणा घेऊन भविष्यातील ध्येय साधले केले पाहिजे. या शिवकालीन युध्दकला मुळे मुलांमध्ये स्वयंशिस्त येते. याचा उपयोग त्यांना ध्येय साधण्यात होणार असल्याचे मत वडगाव शेरी चे माजी आमदार जगदिश मुळीक यांनी व्यक्त केले.
वडगाव शेरी मध्ये नगरसेविका श्वेता गलांडे फाउंडेशन आणि  फिरंगोजी शिंदे बहुद्देशीय सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने वडगाव शेरी मध्ये शिवकालीन युध्द कला प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी मुळीक बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेविका श्वेता गलांडे, महेश गलांडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, अनिल नवले, दत्तात्रय सोंडेकर, सुधीर गलांडे, चंद्रकांत सातव, लक्ष्मण गलांडे, आशा जगताप, गणपत डांगे, शाहीर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेविका श्वेता गलांडे म्हणाल्या की, आपण तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी यांसारख्या पारंपरिक शस्त्रकलेचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. ही कला केवळ शारीरिक ताकदीची नाही, तर ती शिस्त, संयम आणि आत्मविश्वासाची शिकवण देते. हीच ती कला आहे, जिच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक महान स्वराज्य उभं केलं. आजच्या काळात महिलांनी फक्त शिक्षण, व्यवसाय, प्रशासन या क्षेत्रात नव्हे, तर स्वसंरक्षण व राष्ट्र रक्षणाच्या दृष्टीने सज्ज राहणं गरजेचं आहे. या दहा दिवसांच्या प्रशिक्षणातून आपल्यामध्ये जी शारीरिक व मानसिक ताकद निर्माण झाली आहे. ती कधीही उपयोगी पडू शकते. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी, किंवा अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी.






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *