वडगाव शेरी -चंदननगर मधील वाढत्या गुन्हेगारीवर प्रतिबंध उपाय योजना करण्याची मागणी
वडगाव शेरी -चंदननगर मधील वाढत्या गुन्हेगारीवर प्रतिबंध उपाय योजना करण्याची मागणी
पुणे – प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे घडण्याच्या संख्या वाढत आहे. दोन दिवसापुर्वी ऑक्सिजन पार्क उद्यानात तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. चंदननगर- वडगाव शेरी परिसरात दिवसे दिवस गुन्हे वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर प्रतिबंध उपाययोजना करावी अशी मागणी वडगाव शेरी तील सर्व पक्षीय कार्यकत्यांनी चंदनगर पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांना निवेदन दिले.
चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांची गस्त वाढवणे गरजेचे आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करायला हवी. ऑक्सिजन पार्क गेटवर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त हवा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. तसेच
अशा घटना न थांबल्यास सर्व पक्षीय पदाधिकारी पोलीस स्टेशनच्या कारभारा विरोधात पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक सचिन भगत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आशिष माने, महापालिका पथ विक्रेता समितीचे सदस्य निलिमा अय्यर, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे राजू सावंत, आबा निकम, संजय चौधरी, मनसेचे अच्युत मोळावडे, अरुण येवले, कैलास गव्हाणे, बाळासाहेब शिंगाडे, शिवसेना शिंदे गटाचे शंकर संगम, सुमित खेडकर, कॉंग्रेस पक्षाचे करिम शेख, यशवंत सरवदे आदी उपस्थित होते.
