दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात येतील- हिंगणे
दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात येतील- हिंगणे
चंदन नगर प्रतिनिधी
दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी सर्व मुलभूत सुविधा देण्यात येणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालय कात टाकत आहे. स्वच्छ परिसर आणि चांगल्या वातावरणामुळे वकील, पक्षकार आनंदी झाले आहेत. शंभर दिवस उद्दिष्ट कार्यक्रमांतर्गत एक जिल्हा एक नोंदणी अभियान राबविण्यात आले या पुढील काळात देखील अशा अनेक योजना राबवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सह. जिल्हा निबंधक पुणे शहर संतोष हिंगणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने होत असलेल्या महसूल सप्ताह या अनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या माध्यमातून सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 7 यांच्या कार्यालयामध्ये महसूल सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंगणे बोलत होते.
या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी मंगेश खामकर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे अध्यक्ष राजेंद्र उमाप. मा.नगरसेवक महेंद्रजी पठारे, ॲड. भैय्यासाहेब जाधव, ॲड. अशोकराव पालांडे, ॲड.दिलीप जेधे, ॲड.गोरक्षनाथ देशमुख ,ॲड.सुधाकर पाटील, ॲड.पृथ्वीराज थोरात ॲड. दत्तात्रय काळे ॲड. दीपक केसवड,ॲड.प्रशांत जाधव ॲड.महेश जाधव ॲड.गणेश निलक ,तसेच ॲड.सुजाता परदेशी, ॲड.गीता वाव्हाळ ॲड.कविता गायकवाड ॲड.राधिका पाडिया, ॲड.सुधाकर पाटील,मुद्रांक वेंडर बाळाराम भोके,जालिंदर तारळकर,गणेश बेद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभारी दुय्यम निबंधक रोहिणी भिल्लारे यांनी हवेली सात कार्यालयामध्ये मुलभूत सुविधा निर्माण केल्याबद्दल वकील वर्गातर्फे सन्मान करण्यात आला. तसेच कार्यालयीन वर्ग सुमित ओव्हाळ ,अमर काळभोर समाधान पाटोळे यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्रभारी दुय्यम निबंधक रोहिणी भिल्लारे यांनी केले होते. सूत्रसंचलन ॲड.कांताराम नप्ते आणि आभार प्रदर्शन ॲड.सतीश माने यांनी केले.

Sent via Epic Browser