महसूल सप्ताह 2025 अंतर्गत सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 7 चंदननगर येथे कार्यक्रमाचे आयोजन..


महाराष्ट्र शासनाच्या वतीने होत असलेल्या महसूल सप्ताह या अनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या माध्यमातून सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 7 यांच्या कार्यालयामध्ये महसूल सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नोंदणी व मुद्रांक विभागाचे सह जिल्हा निबंधक पुणे शहर श्री संतोष हिंगाणे साहेब तसेच प्रशासकीय अधिकारी श्री मंगेश खामकर साहेब यांच्या सह बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे मा.अध्यक्ष राजेंद्र उमाप साहेब, मा.नगरसेवक श्री महेंद्रजी पठारे ॲड.श्री भैय्यासाहेब जाधव ,ज्येष्ठ विधीतज्ञ अशोकराव पालांडे साहेब ,दिलीप जेधे साहेब, ॲड.गोरक्षनाथ देशमुख ,ॲड.सुधाकर पाटील, ॲड.पृथ्वीराज थोरात ॲड. दत्तात्रय काळे ॲड. दीपक केसवड,ॲड.प्रशांत जाधव ॲड.महेश जाधव ॲड.गणेश निलक ,तसेच ॲड.सुजाता परदेशी , ॲड.गीता वाव्हाळ ॲड.कविता गायकवाड ॲड.राधिका पाडिया तसेच मुद्रांक वेंडर श्री. बाळाराम भोके,श्री.जालिंदर तारळकर श्री.गणेश बेद्रे तसेच वकिलांचे सहकारी मदतनीस मोठ्या प्रमाणात वकील वर्ग व पक्षकार उपस्थित होते.

दुय्यम निबंधक कार्यालय हजर झाल्यापासून प्रभारी दुय्यम निबंधक रोहिणी भिल्लारे यांनी विविध उपाय योजना व बदल करून जास्तीत जास्त सुविधा निर्माण झाल्याबद्दल व या कमी त्यांना सहकार्य करणारे ॲड.सुधाकर पाटील यांचा वकील वर्गातर्फे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच कार्यालयीन वर्ग श्री.सुमित ओव्हाळ ,अमर काळभोर समाधान पाटोळे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.संतोष हिंगाणे साहेब यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या योजनांचे माहिती दिली तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात निर्माण झालेली सुविधा बद्दल ॲड. राजेंद्र उमाप साहेबांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी नगरसेवक महेंद्र पठारे तसेच ॲड.भैय्यासाहेब जाधव, ॲड जेधे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यालयीन सहकारी श्री.सुमित ओव्हाळ, अमर काळभोर, समाधान पाटोळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाचे आयोजन प्रभारी दुय्यम निबंधक रोहिणी भिल्लारे यांनी केले होते .सूत्रसंचलन ॲड.कांताराम नप्ते यांनी तर आभार प्रदर्शन ॲड.सतीश माने यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *