शाळा सुरू होण्यापुर्वी नाल्याचे काम पुर्ण करण्याची मागणी वडगाव शेरी – वडगाव शेरी तील अरनॉल्ड शाळेसमोरील नाल्यावर पावसाळी कलवट करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी सांयकाळी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. लवकरच शाळा सुरू होणार आहे. शाळेत येणाऱ्या वाहनामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापुर्वी नाल्याचे काम पुर्ण करण्याची मागणी माजी स्विकृत सदस्य सुधीर गलांडे यांनी केली आहे.वडगाव शेरी तील अरनॉल्ड शाळे समोर मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचते. या ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण होते. यामुळे नागरिकांना रस्ता वापरता येत नाही. नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाते. पुर परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी पालिकेने या नाल्यावर कलवट करण्याचा निर्णय घेतला आहे. या कलवट करण्याचे काम सुरु आहे. या कामामुळे रस्ता खोंदला आहे. रस्त्याची एक लेन नागरिकांना वापरता येत नाही. रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे वडगाव शेरी तून कल्याणीनगर ला जाणाऱ्या वाहनाची गती कमी झाली आहे. या रस्त्यावर सांयकाळी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे या नाल्यावरील कलवटचे काम पुर्ण करण्याची मागणी होत आहे. याबाबत गलांडे यांनी सांगितले की, पुढील १६ जूनला शाळा सुरू होणार आहे. कल्याणीनगर बिशप शाळा ते वडगाव शेरी कडे जाणाऱ्या रस्त्यावर चार शाळा आहेत. या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. शाळा सुरू झाल्यावर या रस्त्यावर मोठया प्रमाणात वर्दळ असते. नाल्याचे काम शाळा सुरू होण्यापुर्वी पुर्ण न झाल्यास. या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होईल. तसेच, विद्यार्थ्यांना गैरसोयी चे होईल. त्यामुळे पालिकेने तत्काळ नाल्याचे काम पुर्ण करावे. तसेच हरिनगर येथील पुलाचे काम पुर्ण झाले आहे. तरी, पुल वाहतूकीसाठी सुरू केला नाही. हा पुल लवकर वाहतूकीसाठी सुरू करावा.