राजमाता जिजाऊ उद्यानात पार्किंग करण्याची गरज.
राजमाता जिजाऊ उद्यानात पार्किंग करण्याची गरज
वडगाव शेरी ः प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये दररोज तीन हजार पेक्षा जास्त नागरिक येतात. या उद्यानामधील येणारे नागरिक रस्त्यावर वाहन पार्किग करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा होतो. त्यामुळे पालिकेने या उद्यानामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
वडगाव शेरीतील गणेश नगर समोर राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या परिसरामध्ये एकच मोठे उद्यान असल्याने. गणेश नगर आणि खराडीतील नागरिकांची सकाळी आणि संध्याकाळी उद्यानात व्यायामासाठी मोठया प्रमाणात गर्दी होते. उन्हा मुळे लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि महिलांची उद्यानामध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे. या उद्यानासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनासाठी पार्किंग करण्यासाठी जागा राखीव ठेवली आहे. पण, अजून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर, दुकान आणि नागरिकांच्या घरासमोर वाहने लावतात. उदयानात येणारे नागरिक आणि दुकानदारांचा दररोज वाद होतो. वडगाव शेरी जुना मुंढवा रस्ता हा उद्यानासमोर अरुंद आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने लागल्याने. सकाळी आणि संध्याकाळी उद्यानासमोर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे गणेश नगर आणि सुंदराबाई शाळे समोरील चौकात कोंडी होते. याबाबत मातोश्री सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय सोंडेकर यांनी सांगितले की, जुना मुंढवा रस्ता हा अरुंद आहे. या रस्त्याची रुंदीकरण करण्याची गरज आहे. तसेच, उद्यानातील नागरिकांसाठी पार्किंगसाठी जागा राखीव आहे. या राखीव जागेत बहुमजली पार्किंग करण्याची गरज आहे. उद्यानातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह बांधण्याची गरज आहे. या मागण्याबाबत मी पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे.
