सोमनाथ नगरला तलाठी, मंडळ कार्यालयाची नविन इमारत होणार
सोमनाथ नगरला तलाठी, मंडळ कार्यालयाची नविन इमारत होणार
वडगाव शेरी – प्रतिनिधी
वडगाव शेरी तलाठी , खराडी तलाठी, मांजरी खराडी मंडल अधिकारी कार्यालयाची नविन इमारत पाचवा मैल, इनऑर्बिट मॉल जवळ सोमनाथ नगर सर्व्हे नंबर ४५ या ठिकाणी होणार आहे. या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
या बांधकामासाठी या जागेतील अतिक्रमण जिल्हा प्रशासन आणि पालिकेने काढले असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी राजु काष्टे यांनी दिली.
वडगाव शेरी येथील तलाठी कार्यालय नगररोड वरून दोन किं.मी अतंरावर गावठाणामध्ये आहे. यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये जाणे गैरसोयी चे होते. तसेच, तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांचे कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने. नागरिकांना एका कामासाठी दोन ठिकाणी जावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो. तसेच, मनस्ताप होतो. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे काम सोयीस्कर व्हावे. यासाठी वडगाव शेरी, खराडी, मांजरी तलाठी कार्यालय आणि खराडी मंडल अधिकारी कार्यालय एकाच ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सोमनाथ नगर सर्वे नं ४५ ब येथील जागा आरक्षित केली होती.
मात्र, या जागेवर अतिक्रमण झाले होत. ही अतिक्रमण जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी हवेली डॉ यशवंत माने, तहसीलदार हवेली किरण सुरवसे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त व पुणे मनपा कडील अतिक्रमण विभागाकडील भुषण कोकाटे यांचे पथकासह प्राधिकृत अधिकारी स्वाती नरुटे निवासी नायब तहसीलदार हवेली, सीमा ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,संदिप शिंदे मंडल अधिकारी खराडी, राजु काष्टे ग्राम महसूल अधिकारी वडगावशेरी यांनी कारवाई काढली आहे.