पंचायत समिती हवेली जिल्हा पुणे यांच्या वतीने तालुका स्तरावरील 2024 – 2025 पुरस्कार जाहीर . श्रीमती वर्षा हेमंत पवार ( गरुड ) यांची कार्यालयीन गुणवंत कर्मचारी पुरस्कार साठी निवड .
पुणे – तालुका स्तरावरील पंचायत समिती हवेली जिल्हा पुणे यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची यादी जाहीर झाली आहे सन 2024- 2025 करिता हवेली तालुक्यातील अनेक गुणवंत आदर्श शिक्षकांची याकरिता निवड झालेली आहे त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या उत्कृष्ट कार्यालयीन कामकाजा करिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत हवेली तालुका पंचायत समितीच्या वतीने दरवर्षी अशा पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. शिक्षक वर्ग अतिरिक्त कार्यालयीन कर्मचारी श्रीमती पवार वर्षा हेमंत (गरुड) यांना यंदाचा कार्यालयीन गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .या बाबत विविध स्तरावर त्यांचे अभिनंदन केले जात आहे ह्या पुरस्कारांचा वितरण सोहळा आज दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी श्री संत तुकाराम महाराज बँकेट हॉल देहू गाव येथे संपन्न होणार आहे .