रामनवमी उत्सवानिमित्त रामवाडी गावात ढोल – झांजा स्पर्धा.
रामनवमी उत्सवानिमित्त रामवाडीगावात ढोल – झांजा स्पर्धा.
वडगाव शेरी: रामनवमी निमित्त नगररोडवरील रामवाडी गावात रामजन्म सोहऴा, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच, रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी 7 एप्रिलला ढोल-झांजा स्पर्धाचे आयोजन समस्त हिंद तरूण मंडळ, व समस्त गावकरी मंडळ आणि श्री हनुमान मंदिर ट्रस्ट रामवाडी गाव यांनी रामनवमी निमित्त आयोजन केले आहे.
नगररोड वरील रामवाडी गावातील हनुमान मंदीरात पुर्वी पासुन रामनवमी उत्सवानिमित्त रामजन्म सोहळा आयोजित केला जातो. यावेळेस गावची यात्रा असते.
गावातील भजन किर्तनात हजोरो भक्त सहभागी होतात. चंदननगर ,खराडी , येरवडा , वडगावशेरी , विमाननगर, कल्याणीनगर , या भागातुन हजारो भाविक राम दर्शन सोहळ्यासाठी उपस्थित असतात.
रामनवमी उत्सवानिमित्त पहाटे पांडूरंगाची महापुजा, दुपारी 10 ते 1 वाजता रामजन्म सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी ह.भ.प बबन महाराज काकडे वडाळीकर यांचे किर्तन सोहळा होणार आहे.
या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सात एप्रिल ला सांयकाळी ६ वा.पासून होणाऱ्या ढोल-झांजाच्या खेळाच्या स्पर्धा ह्या यात्रेचे आर्कषण असते. यास्पर्धत जिल्ह्यातुन विविध ढोल-झांजाचे खेळ सहभागी होतात. यावर्षी या खेळांतील विजेतांसाठी आकर्षक बक्षिसांचे आयोजित केले आहे. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केला आहे.