नगर रोड -वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्लास्टिक पिशवी मुक्त अभियान


नगर रोड -वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्लास्टिक पिशवी मुक्त अभियान
जुने कपडे घेऊन कापडी पिशव्या शिवून देणार नगररोड वडगाव शेरी क्षैत्रिय कार्यालय
वडगाव शेरी ः
प्लस्टिकच्या वापरामुळे मोठया प्रमाणात प्रदुषण आणि कचरा होत आहे. यामुळे नगररोड क्षैत्रिय कार्यालयाने प्लास्टिक बॅगांचा वापर नागरिकांनी कमी करावा असे आवाहन केले आहे. तसेच, नागरीकांकडून जुने कपडे घेऊन. त्यांना कापडी पिशव्या शिऊन देणार आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त नागरिक कापडी वापरतील. प्लास्टिक वापरणे कमी होणार आहे. यासाठी नगररोड -वडगाव शेरी क्षैत्रिय कार्यालया प्लास्टिक पिशवी मुक्त अभियान राबवित असल्याची माहिती नगररोड वडगाव शेरी क्षैत्रिय कार्यालयाचे सहा. आयुक्त संजय पोळ यांनी दिली.
गेल्या काही वर्षापासून प्लास्टिकचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. पालिके कडून प्लॉस्टिक वापरू नका असे वांरवार आवाहन केले जात आहे. तरी, नागरिक प्लास्टिक वापरत आहे. दुकानामध्ये साहित्य आणण्यासाठी प्लास्टिक बॅंगाचा मोठया प्रमाणात वापर होतो. कापडी पिशव्यांची किंमत जास्त असल्याने अनेकदा नागरिक कापडी पिशव्या वापरत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी नगररोड वडगाव शेरी क्षैत्रिय कार्यालयाने प्लास्टिक पिशवी मुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानामध्ये ज्या नागरिकांना आपले घरातील नको असलेले शर्ट, पॅन्ट,साडी इ. कपडे महापालिका सहाय्यक आयुक्त ,नगर रोड (वडगाव शेरी) कार्यालय अथवा संबंधित विभागाचे अभियंता,आरोग्य निरीक्षक किंवा आरोग्य कोठी येथे जमा करावे. क्षैत्रिय कार्यालया नागरिकांना त्याच्या कापडी पिशव्या शिवून देणार आहे. यामुळे नागरिक जास्त जास्त कापडी पिशवीचा वापर करतील
याबाबत पोळ यांनी सांगितले की, प्लास्टिक पिशवी नको कापडी पिशवी वापरा या अभियानामुळे नागरिक जास्तीत जास्त कापडी पिशव्याचा वापर करतील. ज्यामुळे प्लास्टिक मुळे होणार प्रदुषण होणार नाही. जुने कपडयांचा वापर चांगल्या पध्दतीने करता येणार आहे. या अभियानाची जनजागृती केली जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *