वडगाव शेरीत रंगला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा सोहळा
वडगावशेरी : प्रतिनिधी
वडगावशेरी येथील गणेश नगर मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरा मध्ये दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो यानिमित्ताने सप्ताहाचे आयोजन केले जातं मंदिरामध्ये भजन कीर्तन व आरती तसेच तुकाराम गाथा विविध जप सोहळ्याचे निमित्ताने केल्या जातात.यावेळी विविध फळांची तसेच ड्रॉयफूट ची आरस दाखवली गेली अनेक मान्यवरांच्या या निमित्ताने मंदिरात भेटी होऊन स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी पालखी सोहळा व नगर प्रदक्षिणा आयोजित केली होती .या पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात महिला भगिनी तरुण वर्गाचा सहभाग होता तसेच त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले गेले होते स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात हे मंदिर परिसरामध्ये श्रद्धेचे मोठे स्थान असून पुणे- नगर रस्त्यावरती श्री स्वामी समर्थांचे नावाजलेले व भव्य स्वरूपाचे सभा मंडप असलेले हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे . काल श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भाविकांची प्रचंड रीघ पहावयास मिळाली.
प्रकटदिना दिवशी 30.ते 35 हजार नागरिकांनी सकाळपासून दर्शनाचा लाभ घेतला. महाप्रसाद सायं.पासून 5 पासुन रात्री 11 वाजेपर्यंत चालु होता अंदाजे 15ते 18 हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अशी माहिती देवस्थानचे खजिनदार श्री जालिंदर तारळकर व सचिव ह.भ.प मंगेश महाराज मोरे यांनी दिली तसेच श्री स्वामी समर्थ मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री अशोकराव पलांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष वाटचाल करीत आहे. मंडळाचे सर्व विश्वस्त पुजारी या कार्यामध्ये भक्ती भावाने कार्य सिद्धीस नेत आहेत.