नगररोड वरील वाहनांचा वेग वाढला, पण, रस्ता ओलांडणे अवघ़ड

नगररोड वरील वाहनांचा वेग वाढला, पण, रस्ता ओलांडणे अवघ़ड
वडगाव शेरी –
वाहतूक विभागाने नगर रोड वरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्य चौक बंद केले आहे. मुख्य चौकाच्या पुढे वळण नेले आहे. यामुळे नगररोड वरील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच प्रमाणात सुटली आहे. वाहतूकीचा वेग वाढला आहे. मात्र, वेगाने येणाऱ्या वाहनामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. या रस्त्यावर पादचारी सिग्नल तसेच इतर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहे.
नगर रोड वरील शास्त्रीनगर चौक, नगररोड कडून वडगाव शेरी कडे जाणारा वैकफिल्ड चौक, विमानगर फिनिक्स मॉल जवळील चौकामध्ये मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. बीआरटी,चौकातील बॉटेल नेक यामुळे दररोज संध्याकाळी या रस्त्यावर वाहतूकीचा वेग मंदावत होता..वाहतूक कोंडीच्या समस्या मुळे नागरिक हैराण झाले होते. येरवडा ते विमाननगर येणाऱ्यासाठी नागरिकाना पाऊण तास वेळ लागत होता.या नगररोड वरील वाहतूकीचा ताण विमाननगर, कल्याणीनगर , वडगाव शेरी आणि चंदननगर येथील अतंर्गत रस्त्यावर होत असे. त्यामुळे नगररोड आणि परिसरात संध्याकाळी पाच ते रात्री नऊ दरम्यान नित्याची वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने नगररोड सिग्नल फ्री करण्याचा प्रयोग केला. सुरवतीला विमानगर चौक सिग्नल फ्री केला. त्यानंतर वडगाव शेरी -नगररोड (वैकफिल्ड चौक) आणि नंतर शास्त्रीनगर चौक सिग्नल फ्री केला आहे. यामुळे चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सुटली आहे. तसेच, वाहनाचा वेग वाढला. यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. वाहतूक पोलिसांनी केलेला थोडाश्या बदलाने, अनेक समस्या सोडवली. मात्र, हा प्रयोग करताना पादचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेण्यात आली नाही. वेगवान वाहनामुळे पादचाऱ्याना रस्ता ओलांडता येत नाही. याबाबत स्थानिक नागरिक वसिम सय्यद आणि मातोश्री सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय सोंडेकर यांनी सांगितले की, वाहतूक पोलिसांनी नगर रोड सिग्नल फ्री केल्याने. वाहतूक कोंडीची समस्या सुटली आहे. पण, पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. यामुळे वाहतूक पोलिना रस्ता ओलांडण्यासाठी झ्रेब्रा क्रॉस आणि पादचारी सिग्नल सुरू करण्याची गरज आहे. याबाबत आम्ही वाहतूक पोलिस उपआयुक्तांना भेटणार आहे.
याबाबत वाहतूक पोलिस विभागाचे उपआयुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सिग्नल चौकाचोकामध्ये आहेत. विमान नगरला पादचारी भुयारी मार्ग आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी अधिकच्या उपाययोजना लवकरच करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केला आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहे.