वडगाव शेरी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
वडगाव शेरी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
वडगाव शेरी:
वडगाव शेरी मध्ये ढोल ताशाचा गजर, फुलांची आरास आणि विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
वडगाव शेरी तील पुणे विकास प्रतिष्ठान आणि सुदर्शन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे शिवजंयती साजरी करण्यात आली. यावेळी ढोल ताशा पथकाचे वादन करण्यात आले. तसेच शिवजन्मोत्सव पाळणा, महाआरती करण्यात आला.
धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळाने शिवजंयती निमित्त एचएसआरपी नंबर प्लेट नागरिकांना मोफत बसवून देण्यात आली.
सुनिता नगर येथील शिवगणेश मित्र मंडळांने शिवजयंती निमित्त छावा सिनेमा नागरिकांना दाखवला.
अखिल वडगाव शेरी शिवजंयती उत्सव समितीच्या वतीने वडगाव शेरी गावठाण ते राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दरम्यान मिरवणूक काढण्यात आली.
शिवजयंती आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी राज्यामध्ये ड्राय डे (दारू बंदी) करावी. तसेच जिल्ह्यातील गावामध्ये शहरामध्ये शिवाजी आणि संभाजी चौक असे नाव दिले आहे. त्या चौकांना छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज असे नामकरण करावे. यापुढे कोणत्याही चौकाला महापूरूषांचे ऐकरी नाव देऊ नये. याबाबत राज्यशासनाने परिपत्रक काढावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेना उपशहर संघटक उध्दव गलांडे यांनी दिले.