वडगाव शेरीतील पाणी पुरवठा सोमवार पासून सुरळीत होईल 


वडगाव शेरीतील पाणी पुरवठा सोमवार पासून सुरळीत होईल

पुणे-

लष्कर जलकेंद्र आणि भामा आसखेड प्रकल्पातून पाणी पुरवठा सुरळीत होत आहे. टाक्या भरत आहे. त्यामुळे सोमवार पासून वडगाव शेरी आणि खराडी परिसरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती बंडगार्डन पाणी पुरवठा विभागातील उपआयुक्त एकनाथ गाडेकर यांनी दिली.

वडगाव शेरी मध्ये गेल्या सहा दिवसापासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत होते. यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी वडगाव शेरी पंपिग केंद्रावर टॅंकरसाठी धाव घेतली होती. पण, तरी नागरिकांना पिण्याचा टॅंकर मिळाला नाही. टॅंकर मालकांच्या या मनमानी कारभार आणि पंपिग केंद्रावर होणाऱ्या पाण्याच्या काळाबाजारच्या विरोधात आज वडगाव शेरी तील नागरिकांनी आणि सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वडगाव शेरी पंपिग केंद्रावर आंदोलन केले. यावेळी माजी नगरसेविका सुनिता गलांडे, माजी नगरसेवक संदिप जऱ्हाड, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नारायण गलांडे, महेश गलांडे, माऊली कळमकर, प्रमोद देवकर, श्रीधर गलांडे, शंकर संगम यांच्या नागरिक उपस्थित होते. यावेळी वडगाव शेरी पंपिग केंद्रावरुन टॅंकर भरणे बंद करावे. तसेच, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर मधील पाणी प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. याबाबत उपायुक्त गाडेकर यांनी सांगितले की, काही दिवस पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. पण, यापुढे पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल. तसेच, तांत्रिक समस्या तत्काळ सोडवल्या जातील.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *