भामा आसखेड प्रकल्पातील केबलचे काम पुर्ण झाले. वडगाव शेरीला सांयकाळी पाणी पुरवठा होणार


भामा आसखेड प्रकल्पातील केबलचे काम पुर्ण झाले.

वडगाव शेरीला सांयकाळी पाणी पुरवठा होणार

वडगाव शेरी : भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलची केबल दुपारी जळाल्याने वडगाव शेरी सह नगर रस्त्यावरील भागाचा पाणीपुरवठा अचानक विस्कळीत झाला.

केबल दुरूस्ती काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे आज सांयकाळी भामा आसखडे प्रकल्पातून वडगाव शेरी ला नियमित पणे पुरेसा पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

काल (दि.५ बुधवारी) दुपारी १२ च्या सुमारास भामा आसखेडच्या जॅकवेलमध्ये केबल जळाल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली. परिणामी, या योजनेवर अवलंबून असलेल्या वडगाव शेरी, संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एसआरए, कुलकर्णी गॅरेज, यमुनानगर, राजीव गांधी नॉर्थ व साऊथ, विश्रांतवाडी चा काही भाग, धानोरी, लोहगाव, चंदननगर, खराडी, नगर रस्ता परिसरात भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केबल दुरूस्त करण्याचे काम तत्काळ हाती घेतले. पण, ते काम २४ तासानंतर संपले. यामुळे वडगाव शेरीतील नागरिकांना २४ तासानंतर पाणी मिळाले.

याबाबत पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अन्वर मुल्ला यांनी सांगितले की, आज दुपारी भामा आसखेड जलकेंद्रातील केबल दुरूस्तीचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे आज सायंकाळी नागरिकांना येईल. केबल जळाल्याने काल सांयकाळी आणि आज सकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. पण, आता ही समस्या सुटली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *