वडगावशेरीत पाणी टंचाई  जनता हवालदिल



वडगावशेरीत पाणी टंचाई

जनता हवालदिल

वडगाव शेरी- लष्कर जलकेंद्रातून वडगाव शेरीला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी (दि. २८) रोजी बंद करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून टाटा गार्डन येथील पाण्याच्या टाक्या पुर्ण क्षमतेने भरल्या जात नसल्याने. वडगाव शेरीतील काही भागामध्ये पाच दिवसापासून अपुरा पाणी पुरवठा होत आहे. या पाणी बाणीमुळे नागरीकांची गैरसोय झाली आहे. अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

गेल्या पाच दिवसापासून सोमनाथनगर, सुनिता नगर, धनलक्ष्मी सोसायटी, अष्टविनायक, साईधाम, संजय पार्क या भागामध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अनियमित पणे येत आहे. यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वडगाव शेरी पंपिग स्टेशन गाठले होते. पिण्याच्या पाण्याचा टॅंकर मिळावा यासाठी दिवसभर पंपिग स्टेशन वर नागरिकांची गर्दी होते. नळाला पाणी मिळत नाही. पण, पंपिग स्टेशन वरून टॅंकरने पाणी विकले जात असल्याचे समजताच नागरिकांनी गोंधळ केला. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी माजी नगरसेविका श्वेतो खोसे गलांडे यांनी सांगितले की, पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने. नागरिकांचे हाल झाले. पाणी पुरवठा सुरळीत करावा. तसेच, तांत्रिक अडचणी लवकरात लवकर सोडवावे. वडगाव शेरी पंपिग स्टेशनवरील टॅंकर पाईंट बंद करण्याची मागणी पालिका आयुक्तांना केली आहे. माजी नगरसेवक योगेश मुळीक, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी नागरिकांसह बंडगार्डन पाणी पुरवठा विभाग कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी नागरिकांनी पाण्याच्या समस्या अधिकाऱ्यांना सांगितल्या. मनसेचे हेमंत बत्ते, रमेश जाधव, सुनिल कदम, मनोज ठोकळ, जेमा चव्हाण, लक्ष्मण काते आणि बाळासाहेब शिंगाडे यांनी बंडगार्डन पाणी पुरवठा विभागाने वडगाव शेरी पाणी पुरवठा सुरळीत करावे असे निवदेन पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना देले.

याबाबत बंडगार्डन पाणी पुरवठा विभागाचे उपआयुक्त एकनाथ गाडेकर आणि हेमा केदारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रय़त्ना केला. पण, त्यांनी फोन घेण्याचे टाळले

संकटाच्या काळात पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी फोन घेईना

चार दिवस पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने. नागरिकांची गैरसोय झाली होती. नागरिकांनी पिण्याचे पाणी मिळावे. किंवा पाण्याचा टॅंकर मिळावा. यासाठी बंडगार्डन पाणी पुरवठा विभागाचे उपआयुक्त एकनाथ गाडेकर आणि हेमा केदारी या अधिकाऱ्यांना फोन करत होते. पण, अधिकाऱ्यांनी फोन घेतले नाही. त्यामुळे नागरिकांना बंडगार्डन पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये समस्या घेऊन जावे लागले. पाणी पुरवठा विभाग अत्यावश्यक सेवेत येते. पण, ऐन अडचणीच्या काळात अधिकाऱी फोन घेत नाही. नागरिकांना व्यवस्थित माहिती सांगत नाही. पुर्वी पाणी टंचाईची समस्या होत नव्हती. पण, आता अधिकाऱ्यांच्या समन्वय च्या अभाव आणि चुकीच्या नियोजना फटका नागरिकांना बसत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 


 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *