वडगाव शेरी तील मंत्री मार्केट जंगदबा सोसायटी मध्ये मध्ये दुषित पाणी पुरवठा
वडगाव शेरी तील मंत्री मार्केट जंगदबा सोसायटी मध्ये मध्ये दुषित पाणी पुरवठा
शहरामध्ये दुषित पाणीपुरवठ्यामुळे जीबीएस (गुलियन बैरे सिंड्रोम) हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक जण आजारी पडत आहे. या परिस्थितीमध्ये वडगाव शेरी तील जंगदबा सोसायटी आणि मंत्री मार्केट काही भागामध्ये दुषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करून पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून समस्या सुटत नाही. अधिकारी फक्त आश्वासन देत आहे. या दुषित पाण्यामुळे जीबीएस सारखे आजार होण्याची भिती नागरिकांमध्ये व्यक्त करत आहे.
वडगाव शेरी तील जगदंबा सोसायटी आणि मंत्री मार्केट परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा होत आहे. या परिसरामध्ये रात्री उशिरा पाणी पुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये दुषित पाणि पुरवठा होत आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये मैलापाणी मिसऴत आहे. यामुळे पाण्याला मैली पाण्यासारखी दुर्गंधी येत आहे. पाणी आल्यानंतर अर्धातास नागरीकांना हे दुषित पाणी सोडून द्यावे लागते. त्यानंतर गाळून आणि उकळून पाणी घ्यावे लागत आहे. दुषित पाण्यामुॆळे जीबाएस, गेस्ट्रो, अतिसार सारखे साथीचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या दुषित पाण्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्रीधर गलांडे यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसापासून आमच्या कडे दुषित पाणी येत आहे. पाणी आल्यानंतर सुरवातीला वीस मिनीट मैलापाणी मिश्रित दुषित पाणी येते. दुषित पाण्यामुळे आजारी पडण्याची भिती आहे. आम्ही घरात फिल्टर बसवले आहे. दुषित पाण्यामुळे अनेकाना मिनरल वॉटर बॉटल विकत घ्यावे लागत आहे. पाण्याचा आर्थिक भुर्दंड पडत आहे. याबाबत मी अनेकदा पालिकेच्या पीएमसी केअर आणि मोहल्ला कमिटीमध्ये तक्रार केली. पण, अद्याप काही कारवाई केली नाही. शहरामध्ये जीबीएस ची साथ सुरू असताना. दुषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारीकडे दुलर्क्ष म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणे आहे.
याबाबत पाणी पुरवठा विभागातील अधिकारी हेमा केदारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी फोन घेतला नाही.