विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ पालिकेच्या शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्याची स्वच्छता नाही
वडगाव शेरी ः
शहरामध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे जीबीएस (गुलियन बैरे सिंड्रोम) हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पालिका पाणी उकळून पिण्याचे आवाहन करत आहे. मात्र, दुसरीकडे पालिकेच्या रामवाडीतील लोकमान्य टिळक प्रा. शाळेतील विद्यार्थ्यासाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची टाकी कित्येक महिन्यापासून स्वच्छ केली नाही. तसेच, शाळेतील वॉटर फिल्टर अनेक वर्षापासून बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अस्वच्छ पाणी पिल्याने आजार होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून जीबीएस आजार थैमान घालत आहे. शहरांमध्ये दररोज जीबीएस चे रुग्ण सापडत आहे. सध्या शहरांमध्ये शंभर पेक्षा जास्त जीबीएस चे रुग्ण आहे. हा आजार दुषित पाण्यामुळे होत असल्याने. पालिका नागरिकांना स्वच्छ पाणी प्या. तसेच, पाणी उकळून पिण्याचे आवाहन करत आहे. ठिकठिकाणी पाण्याची चाचणी केली आहे. पण, पालिकेच्या नगररोड वरील रामवाडी गावामध्ये पालिकेची लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच शाळामध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर नाही. या शाळेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये १२७ आणि दुपारच्या सत्रा मध्ये २७८ विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या अनेक वर्षापासून ही शाळा समस्याच्या नी ग्रासलेली आहे. पावसाळ्यामध्ये शाळेमध्ये पाणी घुसते. तसेच, शाळेची टेरेस खुप वर्षापासून गळत आहे. यामुळे शाळेच्या वर्गामध्ये टेरेस मधून पाणी येते. शाळेतील स्वच्छतागृहांची दुरावस्था आहे. अनेक वर्षांपासून शाळेला रंगरंगोटी केली नाही. या शाळेची देखभाल दुरूस्ती वेळेवर करत नसल्याने. शाळा भकास दिसते. शाळेच्या समस्या बाबत नागरिकांनी आणि शिक्षकांनी अनेकदा पालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. तरी, अद्याप शाळेच्या समस्याकडे दुलर्क्ष केले जात आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत शिवसेना (शिंदे गट) उप शहर संघटक उध्दव गलांडे यांनी सांगितले की, शहरामध्ये पाण्यामुळे रोगराई पसरत आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. अस्वच्छ पाणी पिल्याने विद्यार्थी आजारी पडू शकतात. जीबीएस चे शिकार होऊ शकतात. पालिकेने रामवाडी तील शाळेमध्ये वॉटर फिल्टर बसवावे. तसेच शाळेच्या इतर समस्या सोडवण्यसाठी पालिका आयुक्तांना निवदेन दिले आहे.
याबाबत शाळेतील समन्वय शिक्षिका मिनल शितोळे यांनी सांगितले की, शाळेच्या समस्याबाबत पालिका आणि शिक्षण विभागाशी अनेक दा पत्रव्यवहार केला आहे. पण, त्यावर उपाययोजना झाल्या नाहीत. शाळेच्या समस्या बाबत आम्ही अनेकदा पालिकेत जाऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत असतो. शाळेतील समस्याचे निवारण होणे गरजेचे आहे