जीबीएसचा आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना कराव्यात- माजी नगरसेविका श्वेता गलांडे खोसे
जीबीएसचा आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना कराव्यात- माजी नगरसेविका श्वेता गलांडे खोसे
वडगाव शेरी ः-
दूषित पाणीपुरवठ्यामुळे जीबीएस (गुलियन बैरे सिंड्रोम) हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व सतर्कता म्हणून महापालिकेने संपूर्ण वडगावशेरी मतदारसंघातील महापालिकेच्या पाण्याच्या सर्व टाक्या त्वरित स्वच्छ कराव्यात, नागरिकामध्ये या आजाराबाबत जनजागृती करावी मागणी माजी नगरसेविका श्वेता गलांडे खोसे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे महापालिकेने पूर्व पुणे भागात येरवडा ते वाघोली, चंदननगर-खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, लोहगाव, धानोरी या भागात असणाऱ्या सर्व पाण्याच्या टाक्यांतील पाण्याचे नमुने घेऊन त्वरित तपासणी करावी, तसेच या भागामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तो पाणीपुरवठा कोणत्या खासगी टँकरमधून कोणत्या विहिरीतून पाणी आणले जाते, त्या विहिरीतील पाण्याची नमुनेही तपासणी गरजेचे आहे. काही भागात ड्रेनेजचे पाणी जलवाहिन्यांत मिसळल्याने दूषित पाणीपुरवठा होतो, अशी ठिकाणे शोधून या भागांमध्ये मलः निस्सारण विभाग व पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाण्याच्या सर्व टाक्या तसेच सर्व खासगी व सरकारी शाळेच्या पाण्याच्या टाक्यांची व विहिरींची पाहणी करून नमुन्यांचा चाचणी करावी. जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार करावेत. रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य कोठी यांना सूचना कराव्यात. या आजाराबाबत घरोघरी जाऊन या जनजागृती करावी तसेच पत्रक व बोर्ड-बॅनर लावावेत, अशी मागणी त्यांनी श्वेता गलांडे यांनी केली आहे.