चंदननगर पोलीस स्टेशन अंतर्गत सायबर पोलीस चौकी येथे सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण
चंदननगर पोलीस स्टेशन अंतर्गत सायबर पोलीस चौकी येथे सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण
पुणे – चंदननगर पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या सायबर पोलीस चौकी मध्ये टीम आशिष माने व वडगाव शेरी नागरिक मंचातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या चौकीमध्ये विविध मुद्देमाल तसेच जप्त वाहने असून, या ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेता, सामाजिक भावनेतून आशिष माने व वडगाव शेरी नागरिक मंच यांच्या माध्यमातून या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.
या कॅमेऱ्याचे लोकार्पण युवा नेते सुरेंद्र पठारे तसेच पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ सीमा ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) पक्ष वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आशिष माने यांनी केले होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) पुणे शहर उपाध्यक्ष सदाशिव गायकवाड तसेच प्राचार्य संपत धावडे सर, आरपीआयचे खरात गटाचे दयानंद कांबळे, माजी सैनिक कृष्णा बोराडे, मिलिंद पांडे, सुरेश पारटे, विनय जाधव, अमित चौधरी, शमशुद्दीन शेख, तुषार कामथे, प्रवीण बोऱ्हाडे, प्रभाग ५ चे युवक अध्यक्ष किशोर कावरे, प्रशांत सातव, मुकेश चौधरी, राहुल अष्टागे, ओमकार वीर, स्पंदन काळे तसेच वडगाव शेरी नागरिक मंचाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.