आगाखान पॅलेस रस्त्यावरील खडी आणि साहित्यामुळे अपघात


आगाखान पॅलेस रस्त्यावरील खडी आणि साहित्यामुळे अपघात

पुणे: प्रतिनिधी

दोन दिवसापुर्वी रामवाडी ते आगाखान पॅलेस या रस्त्याच्या दरम्यान पदपथाच्या कामासाठी रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी जवाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

नगररोड वरील आगाखान पॅलेस ते रामवाडी पोलिस चौकी दरम्यान पदपथाचे काम काही महिन्यापुर्वी सुरु केले होते. त्यानंतर काही दिवसामध्ये पदपथाचे काम रखडले. या पदपथाच्या कामाचे साहित्य वाळू, विटा आणि खडी रस्त्यावर ठेवण्यात आली आहे. या साहित्यामुळे वाहने घसरतात. तसेच, रात्री अंधारात साहित्य दिसत नसल्यास. वाहन विटांना धडकण्याचा प्रकार दररोज होत आहे.

याबाबत तुकाई माता सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद देवकर यांनी सांगितले की, पालिका गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून पदपथाचे काम करत आहे. सुरुवातीला कामाला गती होती.पण, नंतर काम थंडावले गेले आहे. या कामाच्या साहित्य रस्त्यावर ठेवल्याने अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाला जीव गमवावा लागला. पालिकेच्या या निष्काळजीपणामुळे जीवित हानी झाली. पदपथाचे काम लवकरात लवकर करावे यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा बोलणे झाले होते. तरी, पदपथाचे काम पुर्ण केले नाही. तसेच, रस्त्यावरील साहित्य उचलले नाही.

याबाबत पथ विभागाचे अधिकारी सुनिल मुळे यांनी सांगितले की, पदपथाचे काम निधी अभावी रखडले होते. पदपथाचे काम त्वरीत पुर्ण करण्यासाठी सांगितले आहे. लवकरच काम पुर्ण होईल. रस्त्यावरील साहित्य उचलले जाईल.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *