राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमाचे आयोजन


*राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमाचे आयोजन*

पुणे, दि. : जिल्ह्यात मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विविध प्रकारचे उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे; या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षक परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील योजना व तक्रार निवारणाबाबत माहिती प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा तसेच वजन मापामध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता बाळगण्याबाबतचे संदेश, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आदीबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता आण्याकरीता संदेश व माहिती देणारे विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत, अशी माहिती श्री. सुधळकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *