जिल्ह्यात 24 डिसेंबर पर्यंत सुशासन सप्ताहाचे आयोजन
*जिल्ह्यात 24 डिसेंबर पर्यंत सुशासन सप्ताहाचे आयोजन*
पुणे, दि. 19 : केंद्र शासनामार्फत 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह ‘गांव की और’ या संकल्पेवर आधारित सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाच्या भारत सरकार कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन विभागाने https://darpgapps.nic.in/GGW24 हे संकेतस्थळ विकसित केले असून सर्व संबंधित विभागाकडून ‘सुशासन सप्ताह’कालावधीत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती ऑनलाईनपद्धतीने अपलोड करावी, अशा सचूना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिल्या आहेत.
सुशासन सप्ताह निमित्त आयोजित केलेले उपक्रम, मोहिम तसेच कार्यक्रमाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती सर्व विभागांनी सॉफट प्रती gbpune2016@gmail.com या ईमेल पत्त्यावर तसेच मूळ प्रती खास दुतासोबत 23 डिसेंबर 2024 पर्यंत या कार्यालयास पाठवावे, असेही श्रीमती कदम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.