वडगावशेरी मध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी
वडगावशेरी मध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी
वडगावशेरी मध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी
वडगावशेरी वृत्तसेवा
वडगाव शेरी मध्ये श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक, आधात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. वडगाव शेरी मध्ये उत्साहामध्ये श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली.
रामवाडी गावा मध्ये शिवकर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष उध्दव गलांडे यांनी श्री दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते.
सोपान नगर मध्ये माजी नगरसेविका श्वेतो खोसे गलांडे आणि महेश गलांडे यांनी श्री दत्त जयंती निमित्त भजन आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते.
वडगाव शेरी गणेश नगर रस्ता निलेश आंगण येथे शिवदत्त प्रतिष्ठानचे संतोष जाधव आणि सारिका राहूल दळवी मित्र परिवार यांनी श्री दत्त जयंती निमित्त महाप्रसाद, महिला भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
श्री स्वामी राज विकास प्रतिष्ठानचे जालिंदर तारळकर यांनी राजश्री कॉलनी मध्ये श्री दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
त्याच प्रमाणे शुभम सोसायटी परिसर मध्ये दत्त प्रतिष्ठानचे राजाभाऊ वाघमोडे व सहकाऱ्यांनी महाप्रसाद चे आयोजन केले होते
दिगंबर नगर येथे गणेश भोसेकर यांच्या तर्फे मंदिरा मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद चे नियोजन केले होते
विमान नगर मधील दत्त मंदिर चौकातील श्री गुरुदेव दत्त सेवा मंडळ ट्रस्ट मंदिरामध्ये क्षी दत्त जयंती सोहळा निमित्त सकाळी दत्त याग यज्ञ दुपारी दोन ते चार पर्यंत त्यानंतर पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन रमेश आढाव प्रवीण देडगे बाळासाहेब उबाळे एकनाथ पठारे संजय मासाळकर रामदास जाधव सुरेश काटे अनिल गलांडे विनोद सोनवणे यांनी केले होते.