दुय्यम निबंधक हवेली क्र.24 येथे बेकायदेशीर अर्थ पूर्ण दस्त नोंदणी
दुय्यम निबंधक हवेली क्र 24 येथे अर्थपूर्ण बेकायदेशीर दस्त नोंदणी .
पुणे दि – 10 पुणे येथील दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 24 येथे शासनाच्या नियमाला हरताळ फासत बेकायदेशीर रित्या मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी चालू असल्याची माहिती मिळते
या ठिकाणी दुय्यम निबंधक श्री आर .एम दोंदे यांनी शासनाचे नियम पायदळी तुडवत सर्रासपणे तुकडे बंदी कायद्याचा नियमाचा भंग करून दस्त नोंदणी चालू ठेवली असून अनाधिकृत बांधकामाच्या गुंठेवारीचे तसेच शासनाने ठरवलेल्या प्रमाण भूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची बेकायदेशीर रित्या दस्त नोंदणी चालू आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता दुय्यम निबंध कार्यालय मध्ये मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण कामकाज चालू असून शासनाची फसवणूक केली जात असल्याचे समजते
या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दुय्यम निबंधक श्री दोंदे यांनी नोंदवलेल्या सर्व दस्ताची चौकशी करून त्यात अनियमयता आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.