माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश

माजी नगरसेवकांची बापू साहेब पठारेंना पंसती, अनेकांचा शरद पवार गटात प्रवेश


माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश

पुणे : वडगाव शेरीतील माजी नगरसेविका रेखा टिंगरे व चंद्रकात टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे तसेच ज्येष्ठ नेते प्रकाश (आप्पा) म्हस्के हेही उपस्थित होते.

‘मतदारसंघाच्या विकासासाठी आपण घेतलेल्या प्रवेशाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रवेशाने नक्कीच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला तसेच एकूणच महाविकास आघाडीला बळकटी येईल. तसेच, आगामी विजयाच्या या प्रवासात आपले योगदान मोलाचे ठरेल’, असे उदगार बापूसाहेब पठारे यांनी काढले.माजी नगरसेविका सुनीता साळुंखे, त्यांचे पती अनिल साळुंखे, येरवडा येथील माजी नगरसेवक हनीफ शेख, फरझना शेख, आयुब शेख यांनीही यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. येरवडा येथील माजी नगरसेवक हनीफ शेख, फरझाना शेख, आयुब शेख यांनीही पाठींबा दिल्याने दिवसेंदिवस बापूसाहेब पठारे यांची बाजू मजबूत होत चालली आहे.आमदार असतानाच्या काळात बापूसाहेब पठारे यांनी आमच्या परिसरातील विकासकामे केली होती. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून लक्ष घातले होते. एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर विश्वास असल्यानेच आम्ही पाठिंबा देत आहोत’, असे पाठिंबा देणारे आवर्जून सांगत आहेत.

चौकटः माजी नगरसेवक रेखा टिंगरे यांची धानोरी-टिंगरे नगर

माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश
माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश

भागामध्ये मोठी ताकद आहे. महापालिका निवडणूकीमध्ये सर्वाधिक मताधिक्क्याने निवडणूक आले होते. तसेच, सर्वात जास्त मत त्यांना मिळाली होती. त्यामुळे टिंगरे यांच्या पाठिंब्याचा पठारे यांना मोठा फायदा होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *