बापूसाहेब पठारे यांच्यासाठी जयंत पाटलांची सभा
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.
शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी सायं ६.३० वाजता धानोरी येथील परांडेनगर येथे ही सभा होणार आहे. याआधी शरद पवार, सप्रिया सुळे तसेच रोहित पवार या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सभा या मतदारसंघात झाल्या असून येरवड्यातील सुप्रिया सुळेंच्या सभेत काॅग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व शिवसेना उबाठाच्या सुषमा अंधारे या उपस्थित होत्या.
एकूणच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता सभा व रॅली तसेच पदयात्रांनी मतदार संघात वातावरण तापल्याचे दिसत आहे.