स्टेला मारीस शाळेत मतदान जनजागृती अभियान
स्टेला मारीस शाळेत मतदान जनजागृती अभियान
पुणे प्रतिनिधी – वडगाव शेरी येथील स्टेला मारीस प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सिस्टर अर्कंन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली मतदानाविषयी जनजागृती उपक्रम शाळेतील पालकांसाठी राबविण्यात आला.
यावेळी मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे मतदानाविषयी जनजागृती उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये आपले मत किती बहुमूल्य आहे हे समजावून सांगितले. पालकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले त्यानंतर मतदारांसाठी प्रतिज्ञा घेतली.
मतदानाविषयी जनजागृती अभियान या अंतर्गत विद्यार्थ्यांकडून विविध स्पर्धा घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांचे संकल्प पत्र भरून घेणे, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर पेंटिंग. समाजामध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर अर्कन फर्नांडिस आणि शाळेच्या उप मुख्याध्यापिका सिस्टर गिता गोम्स यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना घेऊन आपल्या परिसरामध्ये प्रभात फेरीचे आयोजन केले आहे.