वडगाव शेरी मध्ये सदगुरू श्री शंकरबाबा महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
वडगाव शेरी मध्ये सदगुरू श्री शंकरबाबा महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
पुणे : प्रतिनिधी – वडगाव शेरी येथे सद्गगुरू श्री शंकरबाबा महाराज यांचा प्रकट दिना निमित्त शनिवार 9 नोव्हेबर ला वडगाव शेरी नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्या आणि अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती श्री मयुरेशदादा अनिल काळदंते महाराज यांनी दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विश्व परिवार वडगाव शेरी यांनी केले आहे.
प्रकट दिना निमित्त नऊ वाजता श्रींना लघुरुद्राभिषेक सोहळा
तसेच सकाळी दहा वाजता शंकर गीता पारायण सोहळा
सायंकाळी चार वाजता पारंपारिक स्वरूपात भव्य दिव्य श्रेणीचा पालखी सोहळा नगर प्रदक्षिणा.
रात्री नऊ वाजता महाआरती आणि भजन संध्या चे आयोजन केलेलं आहे.