वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवार रिंगणात


वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवार रिंगणात

 बापूसाहेब पठारे विरुद्ध सुनील टिंगरे अशी लढत रंगणार

 पुणे प्रतिनिधी

वडगाव शेरी मतदारसंघासाठी 24 जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी आठ जणांनी आज माघार घेतली आहे. शरद पवार गटाचे बंडखोर सुनील खांदवे यांनी ही आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे सुनिल टिंगरे यांच्यात सरळ सरळ लढत रंगणार आहे. दरम्यान, अपक्ष डमी उमेदवार बापू पठारे हे किती मत घेतात हे पाहणे उत्सुकतेचे  ठरणार आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी वडगाव शेरी मतदार संघामध्ये राष्ट्रीय पक्ष, राज्यातील पक्ष आणि अपक्ष अशा 24 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नुकतेच भाजप मधुन राष्ट्रवादी प्रवेश केलेल लोहगाव चे सुनिल खांदवे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना खादंवे यांना मनधरणी केली होती. त्यानंतर नाराज खांदवे यांनी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतला. तसेच, शरद पवार गटाचे उमेदवार बापुसाहेब पठारे यांच्या सारखा नावाने बापू बबन पठारे उमेदवार यांनी अर्ज दाखल केला आहे. या.अर्जावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. विरोधकांनी आमची मत खाण्यासाठी रडीचा डाव करून डमी उमेदवार उभा केल्याचा आरोप केला होता. मात्र, या आक्षेपा नंतर ही बापू बबन पठारे यांनी अर्ज मागे घेतला नाही.

आठ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने. बापूसाहेब पठारे विरूध्द सुनिल टिंगरे अशी सरळ सरळ लढत होणार आहे..

चौकट: – वडगाव शेरी मतदारसंघातून

माघार घेतलेले उमेदवार पुढील प्रमाणे

१) सुरेंद्र बापूसाहेब पठारे

२) सुनील बबन खांदवे

३) विनोद भगवान वैरागर

४) आशा उदय चौधरी

५) सुनील नारायण अंधारे

६) अशोक वामन जगताप

७)हरून करी मुलांनी

८) शईबाज हुसेन अब्दुल कयूम चौधरी

चौकट: –

निवडणूक रिंगणातील उमेदवार

१)हुलगेश मर्याप्पा चलवादी (बसपा)

२)बापूसाहेब तुकाराम पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)

३) सुनील विजय टिंगरे (राष्ट्रवादी काँगेस AP)

४)चंद्रकांत परमेश्वर सावंत

५)विनोद कुमार ओझा (हिंदू समाज पार्टी)

६)विवेक कृष्णा लोंढे (वंचित)

७)शेषनारायण भानुदास खेडकर

८)सचिन दुर्वा कदम

९)सतीश इंद्रजीत पांडे

१०)संजय लक्ष्मण पडवळ

११)अनिल विठ्ठल धुमाळ

१२) अभिमन्यू शिवाजी गवळी

१३)बापू बबन पठारे

१४)मधुकर मारुती गायकवाड

१५)राजेश मुकेश इंद्रेकर

१६) शशिकांत धोंडीबा राऊत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *