वडगाव शेरीत फुटणार प्रचाराचा नारळ !!
पुणे – वडगावशेरी मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री बापूसाहेब तुकाराम पठारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ हा रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता वडगावशेरीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे नारळ फोडून करण्यात येणार आहे .
तसेच प्रचार पदयात्रा देखील काढली जाणार असून मध्यवर्ती निवडणूक काचेरीचे उद्घाटन होणार आहे
या वेळी वडगावशेरी मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे पदाधिकारी तथा नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .