कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतः अतिक्रमण काढले
पुणेः-
पुर्वी महापालिकेने नोटीस दिल्यानंतर ही बिंदास्त अतिक्रमण केली जात होती. पालिकेच्या अतिक्रमण कारवाई जूमानत नसे. पण, काही दिवसापासून महापालिकेने जोरात अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे. या कारवाई मुळे अतिक्रमण करणा-यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईमध्ये जास्त नुकसान होऊ नये. यासाठी वडगाव शेरी, खराडी, विमाननगर आणि कल्याणीनगर मधील व्यापारी आणि नागरीकांनी स्वतःहून फ्रंट आणि साईड मार्जिनचे अनाधिकृत बांधकाम काढु लागले आहेत.
पालिकेने गेल्या काही दिवसापासून अतिक्रमण कारवाई करण्यासाठी जोर लावला आहे. शहरातील प्रत्येक भागामध्ये कारवाई होत आहे. पालिकेने वडगाव शेरी तील जुना मुंढवा रस्त्यावरील टाटा गार्डन ते साईनाथ नगर रस्त्या, कल्याणीनगर, विमाननगर मध्ये मोठया प्रमाणात कारवाई केली होती. या कारवाईमध्ये व्यापा-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. नागरीकांना कारवाई होऊ नये. यासाठी माजी नगरसेवक राजकीय पदाधिकारी यांच्या कडून अधिका-यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण,अधिका-यांनी कोणत्याही दवाबाला बळी न पडता कारवाई केली. या कारवाईची धास्ती अतिक्रमण धारकांमध्ये पसरली आहे. वडगाव शेरी तील व्यापारी आणि नागरीकांनी साईड मार्जिन आणि फ्रंट मार्जिन मधील बांधकाम स्वतः काढले आहे. दुकानासमोरील पत्र्याचे शेड आणि आवरण काढले आहे. दुकानाबाहेरील फ्रिज, पाणी पुरीचे स्ट्रॉल इतर साहित्य काढून घेतले आहे. ज्यामुळे कारवाई झाली.तरी,नुकसान जास्त होणार नाही.
याबाबत एका व्यापा-यांनी सांगितले की, टाटा गार्डन, विमाननगर आणि कल्याणीनगर येथील अतिक्रमण कारवाई मध्ये व्यापा-यांचे जास्त नुकसान झाले. दुकानासमोर ठेवलेले फ्रिज आणि इतर साहित्य पालिकेने जप्त केले आहे. याप्रकारची कारवाई आपल्यावर होऊ नये. यासाठी वडगाव शेरी तील अनेकांन स्वतः अतिक्रण काढले आहे. दररोज कारवाई कुठे होईल. यासाठी कानोसा घेत. कारवाईच्या धास्तीने झोप लागत नव्हती. पण आता मी स्वतःच अतिक्रमण काढले आहे. त्यामुळे कारवाईची चिंता राहिली नाही. यापूर्वी राजकीय पदाधिकारी आणि नगरसेवक कारवाई होऊ देत नव्हते. पण, प्रशासन राज्य आहे. त्यामुळे राजकीय पदाधिका-यांचे कोणीच ऐकत नाही. कारवाईच्या दरम्यान माजी नगरसेवक राजकीय पदाधिकारी फोन घेत नाही.