बीआरटी काढल्याने नगररोड ला सर्व्हिस करावा
पुणेः-
पालिकेने काही दिवसापुर्वी येरवडा ते विमाननगर च्या दरम्यान बीआरटी काढली आहे. जिथे बीआरटी काढली, तिथे सर्व्हिस रोड करावा अशी मागणी नागरिक करत आहे. सर्व्हिस रस्ता नसल्याने वाहनचालकांना पन्नास मीटर जाण्यासाठी चार किं.मीचा वळसा घालून यावे लागत आहे. हा वळसा टाळण्यासाठी अनेकदा वाहन चालक रस्त्याच्या विरुध्द बाजूने वाहन चालवतात. यामुळे अपघात होण्याचा धोका आहे.
पुणे नगर महामार्गावर बीआरटी करताना रस्त्याच्या बाजूला सर्व्हिस रोड करण्याचे नियोजन होते. मात्र, पालिकेला बीआरर्टी मार्ग पुर्ण झाल्यानंतर सर्व्हिस रस्ता करण्याच्या विसर पडला. यामुळे सध्याच्या रस्त्यावरील नियोजीत सर्व्हिस रोडच्या जागेवर पथारीवाले, गाडी विक्रेते आणि व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. बीआरर्टी मार्ग करताना दाट लोकसंख्या असणा-या भागात नागरीकांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग ठेवला नाही. यामुळे नागरीकांना पन्नास मीटर जाण्यासाठी चार किं.मी चा वळसा घालवा लागत आहे. हा वळसा टाळण्यासाठी वाहनचालक विरुध्द बाजूने वाहने नेतात. नगररोड वरील मातृछाया सोसायटी ही सिग्नल पासून दहा मीटरच आहे. पण तिकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरीक विरुध्द बाजूने येतात. याच प्रमाणे उत्तम टॉवर आणि त्या भागातील अनेक सोसायट्यांना शंभर मीटर रस्ता ओलांडण्यासाठी चार किं.मी जावे लागते. रामवाडी गावातील नागरीकांना वडगाव शेरी ला जाण्यासाठी पालिकेने सर्व्हिस रस्ता केला नाही. विमाननगर वरून वैकफिल्ड वस्ती या भागात जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता केला नाही. नगररोडवर सर्व्हिस करावा यासाठी नागरीकांनी पालिका आणि वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार केला होता. वाहतूक विभागाचे अधिकारी आणि पालिकेच्या अधिका-यांना रस्त्याची पाहणी केली होती. त्यावेळी अधिका-यांना सर्व्हिस रोड बाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. पण, त्यांनतर सर्व्हिस रोड झाला नाही. पालिकेने येरवडा ते विमान नगर दरम्यानची बीआरटी काढल्याने. शास्त्रीनगर आणि रामवाडी या भागातील नागरिकांसाठी सर्व्हिस रोड करण्याची मागणी शिवकर्म प्रतिष्ठाणचे अध्यक्ष उध्दव गलांडे आणि श्री तुकाई माता सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद देवकर यांनी पालिके केडे केली आहे.
याबाबत पथ विभागाचे अधिकारी उपेंद्र वैद्य यांनी सांगितले की, नागरिकांनी सर्व्हिस रोडचा प्रस्ताव आल्यानंतर पालिकेच्या संबधित विभाग आणि वाहतूक शाखेची चर्चा करून. त्यावर योग्य तो निर्णय घेता येईल.