श्री मनोज जरांगे पाटील व बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था मध्ये बदल
श्री मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकारिता व
खराडी-चंदननगर येथील महालक्ष्मी लॉन्स पुणे नगर रोड (Mahalakshmi Lawns Pune Nagar Road) या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने सभेचे आयोजन केले आहे
या सभेला मनोज जरांगे पाटील येणार असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे.
शहरातून तसेच पुणे नगर महामार्गवरून येणाऱ्या वाहनचालकांनी वाहने महालक्ष्मी लॉन्सच्या पश्चिम बाजुकडील मोकळ्या मैदानात पार्क करावीत.
तर सोलापूर रोड हडपसर, खराडी वडगाव शेरी मुंढवा परिसरातून येणाऱ्या वाहनचालकांनी वाहने खराडी जकात नाका भाजी मंडई समोरील मोकळ्या जागेत पार्क करावेत
बागेश्वर धामचे श्री धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर यांचा ‘श्री हनुमान कथा सत्संग’ कार्यक्रम 20 ते 22 नोव्हेंबर रोजी संगमवाडी येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमला येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने स्वतंत्र पार्किग व्यवस्था केली आहे.
पार्किंग व्यवस्था खालील प्रमाणे
व्ही. आय.पी/ व्ही.व्ही.आय.पी पार्किंग – जाधवराव पार्किंग
चारचाकी वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था
माझे पार्किंग
केंद्रले पार्किंग
चौगुले पार्किंग
खड्डा पार्किंग
दुचाकी वाहनांसाठी पार्किंग
संगमवाडी रोड, नदीपात्रालगत
लहुजी वस्ताद साळवे स्मारका शेजारी
कार्यक्रम ठिकाणाच्या विरुद्ध बाजुस, नदीपात्रालगत पोलीस वाहनांसाठी पार्किंग असणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी ठिक-ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणी पार्क करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.